मालवण शहर आणि ग्रामीण भागात कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या गंभीर ; वीज ग्राहकांचे होतेय नुकसान…
हरी खोबरेकर यांनी वेधले वीज वितरणचे लक्ष ; त्रुटी दूर करण्याची मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहर आणि ग्रामीण भागात कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे पर्यटन व्यावसायिक, नागरिकांना नाहक त्रास होत असून अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी याकडे महावितरण चे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. पावसाळ्यापूर्वी हा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी श्री. खोबरेकर यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मालवण शहरामध्ये कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पर्यटन व्यावसायिक, नागरिक यांना नाहक त्रास होत आहे. मालवण शहर वायरी, तारकर्ली देवबाग या ठिकाणी पर्यटन वाढत आहे. येथील व्यावसायिक यांना कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्याप्रकारे सुविधा देता येत नसून पर्यटकातून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होते. तसेच एसी, फॅन, अन्य विजेची उपकरणे जळून खाक होतात. तरी आपण शहरातील ग्रामीण भागातील आपण आपल्या स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करून पावसाळ्यापूर्वी वीज पुरवठा सुस्थितीत करावा, अशी मागणी हरी खोबरेकर यांनी केली आहे.