चिवला बीच येथील अत्याधुनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण
आ. वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छीमार नेते बाबी जोगी यांचा पाठपुरावा
मालवण | कुणाल मांजरेकर
धुरीवाडा चिवला बीच येथे मच्छीमार विकास निधी अंतर्गत अत्याधुनिक सर्व सोयीयुक्त अंदाजे रक्कम साडेआठ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि धुरीवाडा गावचे अध्यक्ष दत्ता केळुसकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कामासाठी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छीमार नेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी विशेष पाठपुरावा केला.
बाबी जोगी यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून हे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, उमेश मांजरेकर, युवा सेना तालुकाप्रमुख मंदार ओरसकर, राजू परब, किरण वाळके, तुळशीदास गोवेकर, गणपत आडीवडेकर, सुशील तारी, दादू शिर्सेकर, नागेश वेंगुर्लेकर, नामदेव सारंग, शेखर खोर्जे, किशोर वेंगुर्लेकर, देवेंद्र धुरी, भाऊ कुबल, दिलीप मणचेकर, नारायण तारी, विश्वजीत मणचेकर, सावबा, गणेश मसुरकर, वासू मणचेकर यांच्यासह धुरीवाड्यातील ग्रामस्थ व मच्छिमार बांधव उपस्थित होते.