युवा उद्योजक प्रितम गावडे यांच्यासह युवकांचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
रत्नागिरीतील जाहीर सभेत झाला पक्ष प्रवेश कार्यक्रम ; मालवणात लवकरच पक्षप्रवेशाचा सपाटा – अमित इब्रामपूरकर
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील चौके येथील दिवंगत चिरेखाण व्यावसायिक कै. विलास गावडे यांचे सुपुत्र तथा युवा उद्योजक कु. प्रितम विलास गावडे यांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीत झालेल्या जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मालवण मधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी देखील मनसेमध्ये प्रवेश केला.
यावेळी कु. प्रितम विलास गावडे यांच्यासोबत गणेश सातार्डेकर, राहुल मोंडकर, लौकिक मेथर, तथागत मालवणकर, चिन्मय कुणकवळेकर, प्रमोद डिचवलकर, रोहन तावडे, हर्ष जोशी हे उपस्थित होते. या प्रवेशासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत, मनसे सरचिटणीस परशुराम (जीजी) उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमित इब्रामपूरकर, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनविसे कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी सिंधुदुर्गचे संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल, मनविसे तालुका अध्यक्ष संदीप लाड यांनी विशेष प्रयत्न केले. कु. प्रितम विलास गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशाने मालवण मनसेला नवसंजीवनी मिळेल तसेच लवकरच मालवणात पक्ष प्रवेशाचा सपाटा सुरु होणार असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी सांगितले.