Category महाराष्ट्र

शासकीय योजना राबवण्यात अधिकाऱ्यांमध्ये उदासिनता ; कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

राज्यमंत्री योगेश कदमांचा कुडाळ – मालवण आढावा बैठकीत इशारा : लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करण्याच्या सूचना वाळू व्यवसायिक माफिया किंवा गुन्हेगार नाहीत, कोकण किनारपट्टीसाठी स्वतंत्र वाळू धोरण आखा : आमदार निलेश राणे यांची सूचना कुडाळ : नागरिकांसाठी शासन विविध योजना…

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा जाहीर

प्राथमिक फेरीसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर तर ७ नोव्हेंबरला कणकवलीत अंतिम फेरीत पात्र स्पर्धकांची स्पर्धा कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा घेण्यात येते. यावर्षीच्या स्पर्धेची प्राथमिक फेरीसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम…

हिर्लोक व गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार !

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश : गिरगाव उपशाखाप्रमुख पदी पद्मनाम गुरव तर हिर्लोक शाखाप्रमुखपदी निनाद परब यांची निवड  कुडाळ : हिर्लोक व गिरगाव मध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…

डेरवण येथील “ड्रीम हेल्थ पार्क” देत आहे “आयुष्याचा मंत्र” !

२०१८ मध्ये सुरु झालेल्या हेल्थ पार्कला आजपर्यंत १५ हजार विद्यार्थी आणि खेळाडूंची भेट चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने ड्रीम हेल्थ संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. २० ऑक्टोबर २०१८ रोजी पद्मविभूषण डॉ. अनिल…

हनुमान मंदिरातील लहान मुलांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ; गरजूंना मोफत आयुषमान कार्ड वाटप मंगळवारी रक्तदान शिबीर तर गुरुवारी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन मालवण : श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हॉस्पिटल…

दांडी किनारपट्टीवर स्थानिकांव्यतिरिक्त इतरांना पर्यटन व्यवसाय करण्यास विरोध

स्थानिक व्यावसायिकांच्या बैठकीत एकमुखी ठराव ; अन्वय प्रभू यांची माहिती मालवण : दांडी गावा व्यतिरिक्त बाहेरील पर्यटन व्यावसायिकांना दांडी समुद्रकिनाऱ्यावर कोणताही पर्यटन व्यवसाय करण्यास आमचा विरोध राहील अशी एकमुखी भूमिका सागरी पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आली असल्याची माहिती अन्वय प्रभू…

भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा प्रशासनास आदेश सिंधुदुर्गनगरी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत कृषी विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार करून देखील भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसान भरपाईचा तपशील तसेच क्षेत्रीय तपासणीचा सविस्तर तपशील उपलब्ध करून…

करूळ घाटमार्ग आज मध्यरात्री १२ वा. पासून पूर्ववत सुरु होणार

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती ; दरड हटविणे व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण सिंधुदुर्ग : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाटात ४ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात दरड कोसळून त्याचा मलबा रस्त्यावर आल्याने हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथील दरड हटविणे व दुरुस्तीचे…

जिल्ह्यातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी (जिमाका वृत्त): जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक…

ठाकर समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट, समाजाचे प्रश्न सोडवल्याबद्दल मानले आभार

कणकवली : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. मंत्रालय पातळीवर बैठक आयोजित करून समाजाच्या सुविधांबाबत असलेले अनेक मुद्दे सोडवल्याबद्दल ना. नितेश राणे यांचे यावेळी आभार…

कोकणातील वाळू प्रश्न तीन महिन्यात निकाली काढा : महसूलमंत्र्यांचे निर्देश

येथील वाळू व्यावसायिकांसाठी स्वतंत्र वाळू धोरण निर्माण करताना रॉयल्टी कमी करून त्यांना दिलासा द्यावा : आ. निलेश राणेंची मागणी सह्याद्री अतिथिगृहात महसूल अधिकाऱ्यांची कोकण विभागीय बैठक संपन्न ; माजी मंत्री दीपक केसरकर, आ. किरण सामंत यांच्यासह कोकणातील आमदार, अधिकारी उपस्थित …

परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व अनधिकृत पर्ससीन नौकांवर मत्स्यव्यवसायकडून पुरेशी कारवाई नाही

पारंपरिक मच्छिमारांची नाराजी ; परप्रांतीय तसेच स्थानिक पर्ससीन नौकांवरही कारवाई करण्याची मागणी मालवण : जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व अनधिकृत पर्ससीन नौका यांचे अतिक्रमण सुरु असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून पुरेशी कारवाई होत नसल्याबाबत पारंपारिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मालवण येथील…

error: Content is protected !!