बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या तन्वी म्हाडगुतचा आमदार वैभव नाईक यांनी केला सत्कार
मालवण : बारावी परीक्षेत ९७ % एवढे गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या मालवण तालुक्यातील कट्टा गावची कन्या आणि डॉन बॉस्को स्कूलची विद्यार्थिनी कु. तन्वी केदार म्हाडगुत हिचा आमदार वैभव नाईक यांनी तिच्या कट्टा येथील निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ…