बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या तन्वी म्हाडगुतचा आमदार वैभव नाईक यांनी केला सत्कार

मालवण : बारावी परीक्षेत ९७ % एवढे गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या मालवण तालुक्यातील कट्टा गावची कन्या आणि डॉन बॉस्को स्कूलची विद्यार्थिनी कु. तन्वी केदार म्हाडगुत हिचा आमदार वैभव नाईक यांनी तिच्या कट्टा येथील निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

यावेळी तिची आई शीतल केदार म्हाडगुत, बहीण तनिषा म्हाडगुत, दर्शन म्हाडगुत, वंदेश ढोलम, शेखर रेवडेकर, बाबू टेंबुलकर, राजू गावडे  उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तन्वी हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!