Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

प्रदेश भाजपकडून आ. नितेश राणेंवर पुन्हा विश्वास ; मुख्य प्रवक्त्यांच्या यादीत स्थान

पहिल्या सत्रातील प्रमुख पाच नेत्यांच्या यादीत समावेश ; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घोषणा  सिंधुदुर्ग : विरोधकांकडून भाजपा विरोधी अजेंडा राबवून पक्षाची बदनामी केली जात असल्याने महाराष्ट्र भाजपाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली…

घुमडे खालचीवाडीत मुसळधार पावसाने घर कोसळले : दोन लाखांचे नुकसान

मालवण : मालवण शहर आणि तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाचा घुमडे खालचीवाडीला फटका बसला. येथील अनिल हरिश्चंद्र बिरमोळे यांच्या घराच्या मागील संरक्षक भिंत कोसळून घराचा मागील भाग पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे.…

मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

आमदार वैभव नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचा उपक्रम मालवण : आमदार वैभव नाईक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुक्याच्या माध्यमातून व  मालवण उपशहरप्रमुख यशवंत गावकर यांच्या पुढाकाराने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना आज रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या…

भाजपाच्या मालवण शहरअध्यक्षपदी बाबा मोंडकर

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नियुक्तीपत्र देत केले अभिनंदन मालवण : भाजपाच्या मालवण शहर अध्यक्षपदी विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मालवण भाजपा कार्यालय येथे मोंडकर यांना नियुक्तीपत्र देत अभिनंदन केले. दरम्यान, संघटितपणे काम…

व्हाईट कॉलर असल्याचा दिखावा करणे म्हणजे समाजसेवा नव्हे !

पालकमंत्र्यांवर पत्रप्रपंचातून टिप्पणी करणाऱ्या “त्या” डॉक्टरचा भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी घेतला समाचार मालवण : अधिकारी वर्गाच्या कृपादृष्टीमुळे स्थानिकांवर अन्याय करीत धनदांडग्यांचे लांगूनचालन करणाऱ्या वृत्ती विरोधात पालकमंत्र्यांनी कठोर भूमिका घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्यानंतर कुडाळ मधील विकासक असलेल्या डॉ. बाणावलीकर…

धक्का मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : मालवण येथील धक्का मित्रमंडळाच्या वतीने मामा वारेरकर नाट्यगृह येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ५४  रक्तदात्यांनी रक्तदान केले.  एक हात मदतीचा असे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या धक्का मित्रमंडळ या ग्रुपतर्फे कोरोना महामारी काळापासून रक्तदानाची…

वायरी बांध येथील अंगणवाडी इमारतीचे छप्पर नादुरुस्त ; भाजपा पदाधिकाऱ्यांकडून पहाणी 

भाजपा युती शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर इमारत दुरुस्त करण्याची ग्वाही मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली वायरी बांध येथील नवीन दत्तमंदिर बाजूला असणाऱ्या अंगणवाडी इमारतीचे छप्पर नादुरुस्त झाले असून विटाही कोसळल्या आहेत. यामुळे मुलांची गैरसोय होत आहे. सध्य स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात…

वायरी बांध येथे साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी ; निलेश राणेंकडून मदतीचा हात

मालवण : सततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. यात तारकर्ली वायरी बांध येथील काही घरांना पाण्याचा वेढा पडला होता. शाळेत जाणारी मुले, वृद्ध व्यक्ती यांना डॉक्टर व औषध उपचारासाठी साचलेल्या पाण्यातून वाट काढण्याशिवाय पर्याय नव्हता. सातत्याने निर्माण…

अन् “त्या” आज्जीच्या घराला पडलेला पाण्याचा वेढा सुटला !

माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शिल्पा खोत यांचे आदर्शवत सेवाकार्य  मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे खोत दाम्पत्याने मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर आणि परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी…

निलेश राणेंच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य

कुडाळ : कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस चालू असलेल्या अतीवृष्टी व वादळसदृश परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांना भारतीय जनता पक्षाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून आर्थिक मदत…

error: Content is protected !!