वायरी बांध येथे साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी ; निलेश राणेंकडून मदतीचा हात

मालवण : सततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. यात तारकर्ली वायरी बांध येथील काही घरांना पाण्याचा वेढा पडला होता. शाळेत जाणारी मुले, वृद्ध व्यक्ती यांना डॉक्टर व औषध उपचारासाठी साचलेल्या पाण्यातून वाट काढण्याशिवाय पर्याय नव्हता. सातत्याने निर्माण होणाऱ्या या समस्येबाबत ग्रामस्थांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार ग्रामस्थांच्या मागणी नुसार भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून येथे साचणाऱ्या पाण्याचा निचारा करण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी तात्काळ आर्थिक स्वरूपात व्यवस्था करण्यात आली असे, अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

दरम्यान, सतत कोसळत असलेल्या पावसामुळे वायरी बांध झाड दत्तमंदिर समोरील मार्गांवर वाहते पाणी मोठा प्रमाणात येत असून भाविक व ग्रामस्थ यांना निर्माण होणारी समस्या लक्षात घेता याठिकाणीही भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून उपाययोजना करून मार्ग सुस्थितीत करून दिला जाईल. असेही धोंडी चिंदरकर यांनी आश्वासित केले. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, शक्तीकेंद्र प्रमुख केदार झाड, शक्तीकेंद्र प्रमुख राम चोपडेकर, सरपंच मृणाली मयेकर, अजिंक्य पारकर, जयवंत सावंत, मेघनाथ मयेकर, देवानंद लोकेगावकर, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, संदीप बोडवे, अविनाश केळुसकर आदी उपस्थित होते. 

या आजूबाजूच्या भागात अनेक ठिकाणी पाणी साचणे, घरासभोवती साचलेले पाणी कमी न होणे. आदी समस्यां परिसरात कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी आहेत. या प्रश्नी प्रशासन स्तरावर ठोस उपाययोजना करणेबाबत धोंडी चिंदरकर यांनी तहसीलदार वर्षा झालते यांचे लक्ष वेधत वायरी, तारकर्ली परिसरातील साचणारे पाणी निचारा होणेबाबत ठोस उपापयोजना करणेबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी अशीही मागणी केली आहे. याबाबत तहसीलदार यांनी सकरात्मकता दर्शवली आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य ग्रामस्थांना मिळवून देत योग्य उपाययोजना करून घेत समस्या दूर करण्यासाठी आम्ही सर्व तत्पर असल्याचे धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!