निलेश राणेंच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य
कुडाळ : कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस चालू असलेल्या अतीवृष्टी व वादळसदृश परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांना भारतीय जनता पक्षाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
सरंबळ गावातील शैलेश परब यांच्या घरावर झाड कोसळून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तसेच दीपक वरक यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सरंबळ मधील रमाकांत परब यांच्या घरामागे असलेला डोंगर खचून मातीचा भराव घरावर आल्याने मोठ नुकसान झाले आहे. तसेच रमेश कोरगावकर यांच्या घरानजीक असलेली जमीन व माड बागायत नदीने गिळंकृत केले असून त्यांचे शेतघर व राहते घर यांना धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे कृष्णा वासुदेव म्हापसेकर पिंगुळी (देवूळवाडी ) आणि प्रभाकर महादेव दाभोलकर पिंगुळी (काळेपाणी) यांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त कुटुंबाना भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून भरीव आर्थिक सहाय्य करण्यात आले.
यावेळी भाजपा कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बंड्या सावंत , जिल्हा कार्यकारणी सदस्य पप्या तवटे, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, सरंबळ सरपंच रावजी कदम, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, आनंद शिरवलकर, कुडाळ नगरसेवक निलेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, राकेश नेमळेकर , बाव माजी सरपंच नागेश परब, पिंगुळी ग्रा. प. सदस्य मंगेश चव्हाण, बाळा पावसकर, योगेश घाडी, निखिल कांदळगावकर , सरंबळ उपसरपंच सागर परब, बंटी गोसावी, सुनील हादगे, संजय परब, भाई गावकर, महेश सरंबळकर, मोहन कोरगावकर, प्रसन्न गंगावणे, सागर वालावलकर व इतर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व आपदग्रस्त कुटुंबीयांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.