प्रदेश भाजपकडून आ. नितेश राणेंवर पुन्हा विश्वास ; मुख्य प्रवक्त्यांच्या यादीत स्थान

पहिल्या सत्रातील प्रमुख पाच नेत्यांच्या यादीत समावेश ; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घोषणा 

सिंधुदुर्ग : विरोधकांकडून भाजपा विरोधी अजेंडा राबवून पक्षाची बदनामी केली जात असल्याने महाराष्ट्र भाजपाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन सत्रात प्रवक्त्यांची यादी करून त्यांची विभागणी करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजता पक्षाची भूमिका मांडण्याकरता जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख नेत्यांच्या यादीमध्ये कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना स्थान देण्यात आले आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप नेत्यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. तर  दुपारी ४ वाजता घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषद व बाईट करता भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. विभागीय बाईट व पत्रकार परिषदे करता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांचा समावेश या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. 

आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी अनेकदा पक्षाची भूमिका ठोस व यशस्वीपणे मांडल्याने त्यांचा पुन्हा या भाजपाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे. सकाळच्या ९ वाजण्याच्या सत्रात आशिष शेलार (अध्यक्ष, भाजप मुंबई), रावसाहेब दानवे (माजी केंद्रीय राज्यमंत्री), पंकजाताई मुंडे (राष्ट्रीय सचिव), प्रवीण दरेकर, (गटनेता, विधानपरिषद सदस्य) व नितेश राणे (विधानसभा सदस्य) यांचा समावेश आहे. तर संध्याकाळी सायंकाळी ४ वाजताच्या दुसऱ्या सत्रात सुधीर मुनगंटीवार (मंत्री, महाराष्ट्र राज्य), अशोक चव्हाण (राज्यसभा सदस्य), गिरीष महाजन (मंत्री, महाराष्ट्र राज्य), माधव भंडारी ( प्रदेश उपाध्यक्ष), अतुल भातखळकर (विधानसभा सदस्य), राम कदम (विधानसभा सदस्य) यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

दुपारी ४ वाजता घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी रविंद्र चव्हाण (मंत्री, महाराष्ट्र राज्य), धनंजय महाडिक (राज्यसभा सदस्य), संभाजी निलंगेकर (विधानसभा सदस्य), मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री), संजय कुटे (विधानसभा सदस्य) प्रवीण दटके (विधानपरिषद सदस्य), राम शिंदे (विधानपरिषद सदस्य), श्रीकांत भारतीय (अध्यक्ष, निवडणूक व्यवस्थापन), अमित गोरखे (विधानपरिषद सदस्य), उज्ज्वल निकम (विशेष निमंत्रित सदस्य), आशिष देशमुख (प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र), भारती पवार (माजी केंद्रीय राज्यमंत्री), देवयानी फरांदे, (विधानसभा सदस्य), चित्राताई वाघ (अध्यक्ष, महिला मोर्चा), हिना गावित (राष्ट्रीय प्रवक्ता), अनिल बोंडे (राज्यसभा सदस्य), सदाभाऊ खोत (विधानपरिषद सदस्य), निरंजन डावखरे, (विधानपरिषद सदस्य), अमित साटम (महामंत्री, भाजपा मुंबई) अॅड. अनिकेत निकम यांचा समावेश आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!