घुमडे खालचीवाडीत मुसळधार पावसाने घर कोसळले : दोन लाखांचे नुकसान

मालवण : मालवण शहर आणि तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाचा घुमडे खालचीवाडीला फटका बसला. येथील अनिल हरिश्चंद्र बिरमोळे यांच्या घराच्या मागील संरक्षक भिंत कोसळून घराचा मागील भाग पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे. या दुर्घटनेत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

घुमडे खालचीवाडी येथे एकत्रित पणे पाच कुटुंबांची घरे आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळाधार पावसात यातील अनिल बिरमोळे यांच्या मालकीच्या घराच्या मागील बाजूस असलेली संरक्षक भिंत कोसळली. यात घर मागील बाजूने जमीनदोस्त झाले. घुमडे गावचे पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे हे देखील येथेच राहतात. ऐन पावसात घर कोसळल्याने या कुटुंबावर संकट ओढवले आहे. याचं ठिकाणी त्यांचे देवघर होते. त्याचे देखील नुकसान झाले आहे. तलाठी दळवी, ग्रामसेवक सुतार यांनी येथे पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सरपंच स्नेहल बिरमोळे, माजी सरपंच दिलीप बिरमोळे, उपसरपंच राजू सावंत, राजा बिरमोळे, अंकित बिरमोळे, दत्तू बिरमोळे, सुभाष गावडे, गोट्या राणे आदींनी येथे भेट देऊन पाहणी करून मदत कार्यात सहभाग दर्शवला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!