Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

देवगड-वेंगुर्ला सागरी हद्दीत मासळी चोरीचा गंभीर आरोप; ट्रॉलर मच्छीमार आक्रमक

चार-पाच छोट्या नौकांकडून ट्रॉलरला घेराव घालून मासळी लुटल्याचा दावा; १३ संशयितांसह मालवणमधील पाच खरेदीदारांची नावे पोलिसांना दिली देवगड : समुद्रात कष्टाने मासेमारी करायची आणि त्याच मासळीवर दुसऱ्यांनी डल्ला मारायचा! देवगड ते वेंगुर्ला सागरी हद्दीत ट्रॉलर नौकांमधील मासळी चोरी होत असल्याचा…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा विविध योजनांचा आढावा; रोजगारनिर्मिती आणि जलसंधारणावर भर

‘एकही पात्र मतदार मतदार यादीबाहेर नको’; रोहयोतून अधिकाधिक कामे हाती घेण्याचे निर्देश सिंधुदुर्ग : मतदार यादीत प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश व्हावा, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढाव्यात आणि संभाव्य पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करता याव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत.…

चराठा टेंबवाडीत २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या; परिसरात हळहळ

खिशात सापडली चिठ्ठी; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद सावंतवाडी : चराठा टेंबवाडी येथील परेश उमेश तांबोसकर (वय २४) या तरुणाने राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परेश हा…

मालवणच्या दांडी आवारवाडीत वीज समस्येवर उपाय; स्थानिक नगरसेविका सौ. अन्वेशा आचरेकर यांचा पुढाकार

विद्युत वाहिन्यांवरील झाडी हटवली; वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यातील चढ-उतारातून नागरिकांना दिलासा मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील दांडी आवारवाडी परिसरात विद्युत वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वीजपुरवठ्यात वारंवार चढ-उतार होत होते. यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची…

पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेत गौरेश कांबळी प्रथम

समीर वायंगणकर द्वितीय, भूषण मेतर तृतीय; मालवण नगरपरिषदेत विजेत्यांचा गौरव मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत आयोजित ‘पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी सजावट स्पर्धा २०२६’ चा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी नगरपरिषदेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या स्पर्धेत…

५०० कोटींच्या आरोपावरून आ. निलेश राणेंचा मनोज जरांगेंवर घणाघात

“कोणाकडून तरी ऐकलं म्हणजे पुरावा झाला का? माणुसकी आणि लाज तरी बाळगा!” सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर महाराष्ट्राच्या राजकारणात ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून सुरू झालेल्या वादात आता आमदार निलेश राणे यांनी उडी घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला…

मालवणमध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीला दणका

महसूल-पोलिसांची धडक; तीन डंपर जप्त : प्रत्येक डंपरला १.२५ लाखांपर्यंत दंडाची शक्यता मालवण : मालवणमध्ये रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने जोरदार प्रहार केला. देऊळवाडा नाका येथे मंगळवारी रात्री उशिरा संयुक्त कारवाई करत वाळू वाहतूक…

चिमुकल्यांच्या निरागस प्रेमाने आमदार प्रमोद जठार भारावले!

राधानगरीतील शाळेत दसऱ्यानिमित्त सोन्याची पाने देत विद्यार्थ्यांनी दिल्या शुभेच्छा राधानगरी : पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी राधानगरी तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयांना भेटी दिल्या. यावेळी सरवडे येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना…

देवगड ते ओरोसचा प्रवास आता एका तासात? नितेश राणेंच्या संकल्पनेला बळ

ओरोस–देवगड थेट मार्गाचा राज्याच्या रस्ते विकास आराखड्यात समावेश; ८६ किमीचे अंतर घटून ५४ किमीवर येण्याची अपेक्षा दळणवळण, पर्यटन आणि व्यापाराला मिळणार चालना; पुढील मंजुरी आणि निधीच्या प्रक्रियेकडे लक्ष देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालयाशी जोडणाऱ्या थेट रस्त्याच्या प्रस्तावामुळे तालुक्याच्या…

मालवणकरांना वारंवार वीजखंडित होण्याच्या त्रासातून मिळणार दिलासा

रस्ते न खोदता भूगर्भातून वीजवाहिनी टाकणार; ‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’चे दोन दिवसांत प्रात्यक्षिक मालवण : मालवण शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण रस्ते न खोदता ‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’ पद्धतीने जमिनीखालून वीजवाहिनी टाकण्याचा…

error: Content is protected !!