Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

रत्नागिरीत १९ ऑगस्टला भाजपचे ‘सेवा अभियान’; नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांची उपस्थिती रत्नागिरी : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भाजपा जनसंपर्क कार्यालय, रत्नागिरी येथे ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या…

दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून घुमडेत भक्ती अन् दशावतारी कलेचा जागर

१८ ऑगस्टपासून विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मालवण : घुमडे येथील श्री घुमडाई देवी मंदिरात श्रावणधारा कार्यक्रमांतर्गत यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि दशावतारी नाट्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भजन व दशावतारी नाट्य महोत्सव’ या उपक्रमातून १८ ऑगस्टपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत भाविकांना…

‘टीबीमुक्त सिंधुदुर्ग’चा नितेश राणेंचा निर्धार; १२५ क्षयरुग्णांचे घेतले पालकत्व

सहा महिन्यांसाठी मोफत पोषण आहाराची जबाबदारी; ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाला दिले बळ सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘टीबी मुक्त भारत अभियानाला’ बळ देत सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील १२५ गरजू उपचारित…

ओसरगाव टोलविरोधात संतापाचा भडका; उबाठा नेते विनायक राऊतांचा प्रशासनाला थेट इशारा!

“सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी द्या, अन्यथा टोल नाका बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरू” सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गवासीयांकडून होणाऱ्या टोलवसुलीचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्गातील स्थानिक वाहनधारकांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी…

रील बनवा अन् २५ हजारांचे बक्षीस जिंका…!

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सिंधुदुर्गातील युवकांनी सहभागी व्हावे सिंधुदुर्गनगरी : माती आणि पाण्याच्या संवर्धनावर भन्नाट रील बनवा आणि जिल्हास्तरावर २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जिंका! मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट…

आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती; २२ विकासकामे पूर्णत्वास जाणार

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; मच्छीमारांच्या गरजेनुसार कामांचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना आता गती मिळणार आहे. बंदरातील प्रस्तावित २२ विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या गरजा आणि अपेक्षांना प्राधान्य देत कामांचे…

श्रावणाची सुरुवात कुणकेश्वर महादेवाच्या दर्शनाने; आमदार प्रमोद जठार सहपरिवार नतमस्तक

देवगड : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आमदार प्रमोद जठार यांनी सहपरिवार दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे जाऊन भगवान महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी महादेवाची विधिवत पूजा-अर्चा करून महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी तसेच राज्यातील…

कुडाळमध्ये महाराष्ट्र चेंबरच्या कोकण विभागीय कार्यालयाचा शुभारंभ; ‘गाव तेथे उद्योजक’ संकल्पनेला नवी गती

आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन; मंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्यासह उद्योजकांची उपस्थिती कुडाळ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या कोकण विभागीय कार्यालयाचा शुभारंभ कुडाळ येथे आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते करण्यात आला. ‘स्वप्न सिंधुदुर्गाचे, संकल्प उद्योजकांचे’…

वायरी भूतनाथ मध्ये १९ ऑगस्टला रंगणार ‘नारळ लढवणे’ स्पर्धेचा थरार…

विजेत्याला ११,१११ रुपयांचे बक्षीस : केदार झाड मित्रमंडळाचे आयोजन मालवण : पारंपरिक खेळाला आधुनिक स्पर्धेची रंगत देत केदार झाड मित्र मंडळाच्या वतीने भव्य ‘नारळ लढवणे स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भूतनाथ मंदिराजवळ…

सिंधुदुर्गात संघटनात्मक बांधणीला काँग्रेसचा वेग; तालुकानिहाय बैठकांचे नियोजन

२१ ऑगस्ट पासून बैठकांचे नियोजन : जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची आढावा बैठक रविवारी कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे जिल्हाध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आगामी…

error: Content is protected !!