मालवणात १७ वर्षांखालील निमंत्रितांची “सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग” लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा

मालवण स्पोर्ट्स क्लब आणि विनर्स स्पोर्ट्स ॲकेडमी यांचे आयोजन ; सौरभ ताम्हणकर यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण स्पोर्ट्स क्लब व विनर्स स्पोर्ट्स ॲकेडमी मालवण यांच्यावतीने २४ ते २६ एप्रिल या कालावधीत येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डींग मैदानावर १७ वर्षांखालील निमंत्रितांची “सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग” लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत विजेत्या संघाला ११,१११ रुपये व चषक, तर उपविजेत्या संघाला ५,५५५ रुपये व चषक देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेतील मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी वैयक्तिक स्वरूपातील बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमी मालवण, सुनील नाईक क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी, शिरगाव क्रिकेट ॲकॅडमी देवगड, केजी क्रिकेट ॲकॅडमी आरोंदा, स्वामी समर्थ क्रिकेट ॲकॅडमी वेंगुर्ले, कुडाळेश्वर क्रिकेट ॲकॅडमी कुडाळ हे संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!