मालवण तालुका भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
माधुरी मोहन मसुरकर, राणी विनायक पराडकर, वैष्णवी विष्णू मोंडकर, महिमा महेश मयेकर, सिद्धी माणगावकर, दिव्या दिनेश कोचरेकर यांना संधी
मालवण | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पार्टी मालवण महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्त्या तालुकाध्यक्ष पूजा करलकर व शहरअध्यक्षा चारुशीला आचरेकर यांनी जाहीर केल्या आहेत.
यामध्ये मालवण तालुका ग्रामीण उपाध्यक्षपदी माधुरी मोहन मसुरकर, मालवण तालुका उपाध्यक्षपदी राणी विनायक पराडकर, शहर उपाध्यक्षपदी वैष्णवी विष्णू मोंडकर, शहर सरचिटणीसपदी महिमा महेश मयेकर, युवती अध्यक्षपदी सिद्धी माणगावकर तर उपाध्यक्षपदी दिव्या दिनेश कोचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाच्या धेय्य धोरणानुसार काम करताना सर्वसामान्य जनतेला न्याय देणे, पक्ष संघटना वाढवणे यासाठी जोमाने करा. असे सांगत नवनियुक्त पदाधिकारी यांना पूजा करलकर व चारूशिला आचरेकर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप ओबीसी मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, महानंदा खानोलकर, सौ. तारका चव्हाण आदी जेष्ठ महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.