मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संतोष गावडे यांची फेरनिवड

सचिवपदी सौगंधराज बादेकर, उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर, सहसचिवपदी संदीप बोडवे तर खजिनदारपदी सिद्धेश आचरेकर यांची निवड

मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ ते २०२५ या कालावधीसाठी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष संतोष गावडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. समितीच्या सचिवपदी सौगंधराज बादेकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर, सहसचिवपदी संदीप बोडवे तर खजिनदारपदी सिद्धेश आचरेकर यांचीही निवड करण्यात आली आहे.

जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा निवडणूक निरीक्षक दाजी नाईक आणि सदस्य राजेंद्र मुंबरकर यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालयात मालवण तालुका पत्रकार समितीची अध्यक्ष व सर्व कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, महेश सरनाईक आदी उपस्थित होते. यावेळी निवडण्यात आलेल्या तालुका कार्यकारणीमध्ये सदस्य म्हणून कुणाल मांजरेकर, गणेश गावकर, नितीन गावडे, प्रशांत हिंदळेकर, उदय बापर्डेकर, अमित खोत, सुधीर पडेलकर यांचा समावेश आहे. नूतन कार्यकारिणीचे निवडणूक निर्णय निरीक्षक दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी आप्पा मालंडकर, संग्राम कासले, प्रफुल्ल देसाई, नितीन आचरेकर, शैलेश मसुरकर, अमोल गोसावी, परेश सावंत, समीर म्हाडगुत, अर्जुन बापर्डेकर, पी. के. चौकेकर, अनिल तोंडवळकर, मनोज चव्हाण, महेश कदम, महेंद्र पराडकर आदी सदस्य उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3594

Leave a Reply

error: Content is protected !!