मालवण स्पोर्ट्स क्लब आयोजित “मालवण प्रीमियर लीग २०२३” चे उद्घाटन !

२ एप्रिल पर्यत मालवण टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंडवर आयोजन : अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर, उपाध्यक्ष गौरव लुडबे व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतील स्पर्धेचे पाचवे वर्ष

मालवण : मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित मालवण प्रीमियर लीग २०२३ (पर्व पाचवे) या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन रविवारी जेष्ठ क्रिकेटपटू भाऊ हडकर यांच्या हस्ते करण्यात आले. २६ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत मालवण टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंडवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी अध्यक्ष सौरभ ताम्हणकर, उपाध्यक्ष गौरव लुडबे, नितीन कानसे, सुशील शेडगे, फ्रान्सिस फर्नांडिस, प्रसाद राणे, पायस आल्मेडा, संदीप पार्टे, वैभव सावंत, विशाल लुडबे, संदीप पेडणेकर, ज्ञानेश केळुसकर, विल्यम परेरा, राकेश सावंत, निषय पालेकर, रुपेश करलकर, डॅनिश फर्नांडिस, बंटी केरकर यासह अन्य उपस्थित होते.

या स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळवले जात आहेत. रविवारी सेंट पीटर देवबाग, मॉंजिनिस ब्रिझी वूड ११ यासह अन्य दोन संघात सामने खेळले गेले. २ एप्रिलला अंतिम।सामना रंगणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला रोख रु. ५५,५५५ /- व चषक तर उपविजेत्याला रोख ३३,३३३/- व चषक अश्या स्वरूपात पारितोषिके असणार आहेत. अध्यक्ष सौरभ ताम्हणकर व सहकारी यांच्या माध्यमातून पाच वर्षे यशस्वीपणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. एक आदर्शवत स्पर्धा म्ह्णून या स्पर्धेचा नावलौकिक जिल्ह्यात आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!