गाबीत महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्या मालवणात उदघाटन
मालवण : शहरातील दांडी किनारपट्टीवर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ‘गाबीत महोत्सव २०२३’ च्या कार्यालयाचे उद्घाटन रविवार दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. रविकिरण तोरसकर यांच्या अखत्यारितील फोवकांडा पिंपळ- मालवण येथील गाळ्यात हे कार्यालय सुरू होत आहे. तरी कार्यालय उद्घाटनास गाबीत बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, सरचिटणीस महेंद्र पराडकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, मालवण तालुकाध्यक्ष डॉ.प्रमोद कोळंबकर, अन्वय प्रभू, मेघा गावकर ,सौ.अन्वेषा आचरेकर, सौ.सेजल परब, हरी खोबरेकर, बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सौ.दर्शना कासवकर, दिलीप घारे, मेघनाथ धुरी, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, सौ.स्नेहा केरकर, भूषण मेतर, नारायण धुरी, मालवण अध्यक्ष अरविंद मोंडकर व इतर गाबीत समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.