आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळवाडा रामेश्वर मंदिरात लघुरुद्र

मालवण | कुणाल मांजरेकर : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील देऊळवाडा रामेश्वर मंदिर येथे रविवारी सकाळी लघुरुद्र करण्यात आला.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महीला उपजिल्हा संघटक सौ सेजल परब, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, तपस्वी मयेकर, ज्योती मयेकर, नंदा सारंग, संमेष परब, उमेश मांजरेकर, आकांशा शिरपुटे, निना मुंबरकर, मनोज मोंडकर, मोहन मराळ, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, बाबू वाघ, महेंद्र म्हाडगुत, हेमंत मोंडकर, किशोर गावकर, उमेश चव्हाण, दत्ता पोईपकर, नाना नाईक उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व येणाऱ्या संकटाना मात करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थना रामेश्वर चरणी करण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!