आभाळमाया ग्रुपतर्फे वराड येथील प्रथम क्लिनिकला ईसीजी मशीन सुपूर्द

ग्रुपचे सदस्य हॉटेल अतिथी बांबूचे संजय गावडे यांचे सहकार्य

मालवण | कुणाल मांजरेकर

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून आभाळमाया ग्रुपचे सदस्य आणि मालवण येथील हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे यांच्या सहकार्याने वराड गावातील प्रसिद्ध डॉक्टर आणि कोरोना काळात कट्टा पंचक्रोशतील कोरोना बाधित रुग्णांना सेवा देणाऱ्या कोरोनायोद्धा डॉ. प्रथमेश वालावलकर यांच्या प्रथम क्लिनिकला कट्टा पंचक्रोशीतील जनतेच्या आरोग्यविषयक अत्यावश्यक सेवेसाठी ईसीजी मशीन सुपूर्द करण्यात आली.

कट्टा पंचक्रोशीत ही सेवा फक्त डॉ. खाडिलकर यांच्याकडे उपलब्ध होती. आता ही सेवा वराड येथे प्रथम क्लिनिक येथे सुद्धा उपलब्ध असेल. या कार्यासाठी आभाळमाया ग्रुपचे सदस्य सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ. संजय नवांगुळ, ॲड. प्रदीप मिठबावकर, समीर रावले, नितीन शेट्ये, शुभम मसुरेकर, जगदीश परब या ग्रुप सदस्यांचे सहकार्य लाभले. संजय गावडे हे सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असून किल्ले संवर्धन, रक्तदान चळवळ, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. या कार्यासाठी त्यांनी आभाळमाया ग्रुपची निवड केल्याबद्दल राकेश डगरे यांनी आभाळमाया ग्रुप तर्फे त्यांचे आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!