मालवण देवली मार्गे तारकर्ली परुळे रस्त्याच्या नूतनीकरणाला मंजुरी ; २० लाखांचा निधी प्राप्त
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माजी खा. निलेश राणे, दत्ता सामंत यांचा पाठपुरावा ; मंदार लुडबे यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील मालवण देवली मार्गे तारकर्ली परुळे रस्त्याच्या नूतनीकरणाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हा नियोजन मधून या कामासाठी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी भाजपचे प्रदेश सचिव माजी खा. निलेश राणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी पाठपुरावा केला होता, अशी माहिती भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी दिली आहे.