माजी खा. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कांदळगाव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी रामेश्वर येथील श्री रामेश्वर मंदिरात भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश पूजन, अभिषेक, लघुरुद्र विधी करण्यात आले. तसेच भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले. येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून निलेश राणे आमदार होऊ देत असे गाऱ्हाणे रामेश्वर चरणी घालण्यात आले.

भाजपा नेते निलेश राणे यांचा वाढदिवस मालवण भाजपच्या वतीने विविध उपक्रमांनी तालुक्यात साजरा करण्यात येत आहे. आज सकाळी कांदळगाव येथे श्रीदेव रामेश्वर मंदिरात गणेशपूजन, अभिषेक, लघुरुद्र आदी विधी पार पडले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, निलेश खोत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3841

Leave a Reply

error: Content is protected !!