प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडीचा जिल्हास्तरीय महिला मेळावा उत्साहात

महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमानी मेळाव्याला रंगत

मालवण | कुणाल मांजरेकर

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी शाखा मालवणतर्फे ओरोस येथे शिक्षक भारती महिला आघाडी अध्यक्षा शितल परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि फातिमाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

प्रथम सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी महिला शिक्षकांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग महिला आघाडी सचिव वैशाली मिसाळ यांनी केले. यावेळी आशा गुणिजन मॅडम यांनी संघटनेला २५ हजार रु ची देणगी दिली. यानंतर शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या मावळत्या अध्यक्षा आशा गुणिजन मॅडम व विजया डगरे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष पाताडे यांनी आपल्या भाषणातून जुनी पेन्शन, महिलांचे प्रश्न, संघटनेची दिशा व धोरणे याबाबत मार्गदर्शन केले. राज्य उपाध्यक्ष दया नाईक यांनी ज्वलंत असा सध्या चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे प्राथमिक शिक्षक पतपेढी सिंधुदुर्गकडून शिक्षकांवर होणारा अन्याय, याबाबत उपोषण करण्याचे सूतोवाच केले. तसेच श्रीम. परुळेकर यांनी आपल्या भाषणातून शिक्षक भारतीने यशस्वी केलेल्या ‘आंतरजिल्हा बदली समावेश” या संदर्भात संघटनेचे योगदान अधोरेखित केले. यावेळी जिल्हाध्यक्षा सौ. गुणिजन यांनी संघटनेच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीम. प्रीती सावंत, श्रीम. रुपाली जाधव व श्रीम. शरयू पाटील यांनी आपल्या मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम. यामध्ये सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी महिलांनी बहारदार नृत्ये सादर केली. स्मिता गावडे, लीना भंडलकर, स्नेहल बेलसरे यांनी बहारदार वैयक्तिक नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. दोडामार्ग टीम ने अप्रतिम अशा सादर केलेल्या सामूहिक नृत्याने सर्वांची मने जिंकली. टीम आंबेरी, कणकवली टीम, कुडाळ टीमने देखील आपली बहारदार नृत्ये सादर केली. सरिता नाईक व केळुसकर यांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दररोजच्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस स्वतःचे छंद जोपासताना व आपली कला सादर करताना वेगळाच आनंद महिलांमध्ये दिसून आला.

बक्षीस समारंभामध्ये प्रत्येक सहभागी महिलेला भेटवस्तू देण्यात आली. सर्वात शेवटी उपस्थित प्रेक्षकांमधून ८ जणांना लकी ड्रॉ देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक ठाकरे व महेश कदम यांनी केले.शेवटी महिला आघाडी अध्यक्षा श्रीम शितल परुळेकर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष विनेश जाधव, महेश कदम, विठ्ठल शिंदे, पांडूरंग थेटे, मधुकर बाचिफळे, तुकाराम खिल्लारे, दिनकर शिरवलकर, कृष्णा कालकुंद्रिकर आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष पाताडे, राज्य उपाध्यक्ष दया नाईक, जिल्हा महिला आघाडी सचिव वैशाली गर्कळ, कुडाळ महिला आघाडी अध्यक्षा प्रीती सावंत, दोडामार्ग अध्यक्षा शरयू पाटील, कणकवली प्रतिनिधी रुपाली जाधव, मालवण शिक्षक भारतीचे अध्यक्ष संतोष कोचरेकर, सचिव संतोष परब, जिल्हा प्रतिनिधी श्रीम. लीना भंडलकर, नेहा गवाणकर,जयश्री दोडके आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!