मालवणच्या बोर्डिंग मैदानावर आजपासून “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक २०२३”
स्पर्धेच्या पूर्वसंध्येला चषकाचे अनावरण ; आज सायंकाळी ४ वा. मोटारसायकल रॅली तर सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचे उदघाटन
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर लाखो रुपये पारितोषिक रक्कमेच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या भव्य स्वरूपातील डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १९ मार्च या कालावधीत होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आज सायंकाळी ६ वाजता होणार असून तत्पूर्वी ४ वाजता शिवसेना शाखेकडून बाजारपेठ मार्गे बोर्डिंग मैदानापर्यंत मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण स्पर्धेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी करण्यात आले.
स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक व ३ लाख, उपविजेता संघास भव्य चषक व १ लाख ५० हजार व वैयक्तिक स्तरावरील अन्य पारितोषिके असणार आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजन होणार आहे. असे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, बाबी जोगी, मंदार ओरसकर यांनी सांगितले.
बुधवारी १५ मार्च २०२३ सायं. ४ वा. भगवा चषक २०२३ ची भव्य शोभायात्रा शिवसेना शाखेकडून बाजारपेठ डॉ. बल्लव मार्गाने बोर्डींग मैदान येथे येणार आहे. भगवा चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व शुभारंभाचा सामना बुधवार १५ मार्च रोजी सायं. ६ वा. संपन्न होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार वैभव नाईक, प्रमुख उपस्थिती अरूण दुधवडकर, गुरुनाथ खोत, भाई गोवेकर, महेश कांदळगांवकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, सतिश सावंत, अतूल रावराणे, सुशांत नाईक, मंदार शिरसाट, साक्षी प्रभु आदी पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केले आहे.
या स्पर्धे दरम्यान प्रेक्षकांसाठी व्हीआयपी बैठक व्यवस्था असणार आहे. बैठक व्यवस्थेची शुल्क भरणा नोंदणी केल्यानंतर त्या प्रेक्षकांची खुर्ची राखीव स्वरूपात आरक्षित करून ठेवली जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मंदार केणी मोबा : 9370639960, 9637778901 यांच्याकडे संपर्क करावा. अशी माहिती हरी खोबरेकर यांच्या वतीने देण्यात आली आहे.