मोटरसायकलची झाडाला धडक ; मुलगा ठार, वडील गंभीर जखमी

कुणकवळे ग्रा. पं. नजिक दुर्घटना ; धोकादायक आंब्याचे झाड तोडण्याची मागणी


मालवण : मालवण येथून कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची आंब्याच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अमित शरद गावडे (वय ३९) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेले त्यांचे वृध्द वडील शरद गावडे (दोघेही मुळ रा. मालवण साळकुंभा, सध्या रा. महान) हे रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी कुणकवळे ग्रामपंचायत नजिक हा अपघात झाला. अपघातानंतर जखमी शरद गावडे यांना कुणकवळे ग्रामस्थानी अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहीकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मृत दुचाकीस्वार अमित हा मुंबईस्थीत होता. उशीरापर्यत त्याची ओळख पटत नव्हती. अखेर उशीरा ओळख पटली. अमित आपल्या वडीलांना मोटारसायकल वरुन प्रवास करत असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कुणकवळे सरपंच मंदार वराडकर यांच्यासह कुणकवळे ग्रामस्थ, चौके येथील बीजेंद्र गावडे आणि ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. मालवण पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा केला. मृत अमितचे शव मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या शवागृहात नेण्यात आले. अपघात स्थळी पोलिस उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलिस सुनिल चव्हाण, जाँयल फर्नाडीस, डेवेश प्रभू दाखल झाले होते.

वारंवार अपघात होणारे कुपेरी घाटी कुणकवळे ग्रामपंचायत नजीकचे रस्त्यावर असलेले आंब्याचे झाड तोडण्याची मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. कुणकवळे सरपंच मंदार वराडकर यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!