काळसे बागवाडीच्या पुरग्रस्त शेतकऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारचा दिलासा
२०१९ च्या भातपिक नुकसानीचे रखडलेली मदत महसूल विभागाकडे प्राप्त ; माजी खा. निलेश राणेंचा पाठपुरावा
३८ शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ३ लाख ३७ हजारांची रक्कम होणार जमा
मालवण | कुणाल मांजरेकर
२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथील शेतकऱ्यांच्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे होऊन कोणतीही मदत ठाकरे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपूराव्याने संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी माजी खा. राणेंच्या नेतृत्वाखाली सोमवारी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ३८ शेतकऱ्यांच्या खात्यात मंगळवारी ३ लाख ७० हजार नुकसानभरपाई मदतनिधी जमा होणार आहे, असे प्रशासनाने सांगितले. याबाबत शेतकऱ्यांनी निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, संतोष साटविलकर, महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, आबा हडकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, दादा नाईक, राजन माणगांवकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निषय पालेकर, भाई मांजरेकर यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. २०१९ मध्ये काळसे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मधले सरकार कोणाचे होते यावर बोलणार नाही. मात्र शिंदे फडणवीस सरकार आले आणि ३८ शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई पोटी रखडलेले पैसे मंजूर झाले. आज सर्व शेतकरी आले होते. तहसीलदार यांनी शासनाने पाठवलेले पैसे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शब्द दिला आहे. या सरकारमध्ये झटपट कामे होतात याचे हे तत्पर उदाहरण आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असे निलेश राणे यांनी सांगितले.
विजय गंगाराम कुडाळकर, कृष्णा सदाशिव माडये, सत्यवान गंगाराम कुडाळकर, लक्ष्मण पांडुरंग जावकर, स्नेहलता नरेंद्र सावंत, विश्वंभर सदाशिव माडये, प्रतिक्षा केशव सावंत, विश्वंभर सदाशिव माडये/सुप्रिया, सदाशिव माडये, अनिल श्रीधर पावसकर / सुलोचना श्रीधर पावसकर, सत्यवती पुंडलिक माडये (रमेश शांताराम कुडाळकर), मयता वीणा रमेश कुडाळकर, सत्यवान गिरीधर काळसेकर, सविता संतोष खोत पती संतोष, प्रभाकर खोत सत्यविजय दिनकर परब / कल्याणी सत्यविजय परब ताराबाई चंद्रकांत खोत, अंकिता आनंद कुडाळकर (ज्ञानदेव गंगाराम माडये) मालिनी विनोद पावसकर, देविदास नारायण केळजी, दमयंती दत्ताराम मांजरेकर, संतोष शांताराम माड्ये, रमेश सोमा माडये, रामचंद्र संभाजी खोत, अरविंद संभाजी खोत, अभिषेक भरत हेरेकर, विजया मुरारी माड, (धोंडी भगवान माइये मयत) पत्नी दर्शना धोंडी माडये, शंकर नारायण नार्वेकर उषा प्रभाकर माडये, चंद्रभागा विष्णू शेलटे सुनिल श्रीधर पावसकर, (दिगंबर पुरुषोत्तम माडये मयत ) पत्नी अर्चना दिगंबर माडये, शैला दत्ताराम पावसकर धोंडी परशुराम धुरी, दशरथ वसंत नार्वेकर, (शिवाजी सदाशिव माड्ये मयत ) मुलगा कैलास शिवाजी माड्ये, अनिता अंकुश कुडाळकर सावित्री सत्यवान नाईक, प्रतिक्षा सुहास माडये, अनुराधा प्रेमानंद माड्ये आदींचे लाखो रुपये नुकसान झाले होते. यांना ३ लाख ७० हजार मदतनिधी उपलब्ध झाला आहे.