महिला दिनानिमित्त “एमआयटीएम” कॉलेजमध्ये महिलांच्या लैंगिक शोषण कायद्याबाबत जनजागृती
ॲड. प्राजक्ता गावकर यांनी केले मार्गदर्शन ; महिलांच्या आकर्षक वेशभूषांनी कार्यक्रमात रंगत
मालवण | कुणाल मांजरेकर
जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड (ओरोस) च्या वतीने बुधवारी महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कॉलेज मध्ये ॲड. प्राजक्ता गावकर यांनी स्त्री लैंगिक शोषण कायद्या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कायद्याचे महत्व आणि कायद्याचे उल्लंघन झाल्यास होणाऱ्या शिक्षेची कल्पना दिली.
एमआयटीएम कॉलेजमध्ये बुधवारी महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य प्रा. नवले यांनी न्याय हा सर्वांसाठी समान असावा असे मत व्यक्त केले. महिला ह्या खूप सहनशील असतात. अडचणीतून मार्ग काढण्याचे कौशल्य हे फक्त महिलांमध्येच असते, असे ते म्हणाले ऍकॅडमिक डीन प्रा. पूनम कदम म्हणाल्या, ८ मार्च १९०८ रोजी न्युयार्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री – कामगारांनी रुतगर्स चौकात एकत्र येऊन प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. या ऐतिहासिक कामगिरीची आठवण म्हणून ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो
कॉलेजच्या प्रा. भाग्यश्री वाळके, प्रा. रोशनी वरक या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रारंभी प्रमुख प्राहुण्या ॲड. प्राजक्ता गावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्गघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कॉलेजचे प्राचार्य प्रा. एस. सी. नवले, ऍकॅडमिक डीन प्रा. पूनम कदम, एक्झाम डीन प्रा. विशाल कुशे आदी उपस्थित होते. यावेळी एमआयटीएम च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेत गेली दहा वर्षे कार्यरत असलेल्या ऍकॅडमिक डीन प्रा. पूनम कदम आणि सर्वांच्या सेवा करणाऱ्या महिला कार्यतत्पर शिपाई जिकमडे मावशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कु. मयुरी घाडी हिने देखील ८ मार्च संदर्भात थोडक्यात इतिहास सांगितला. यावेळी वेगवेगळ्या वेशभूषा सादर केल्या. त्यावेळी चित्रांगी मेस्त्री हिने सावित्रीबाई फुले, मयुरी घाडी हिने झाशीची राणी, रिया धुरी हिने जिजामाता, उज्ज्वला निकम हिने किरण बेदी, ऋतुजा शिरधनकर हिने कल्पना चावला तर सोनिका चव्हाण हिने नोकरीपेशातील महिला ही वेशभूषा साकारली. समता पाटील हिने कविता वाचन केले. महिला दिनाचे औचित्य साधून प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी यावेळी कार्यक्रमात वेगवेगळे फनी गेमचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी शेटकेने केले. तर जस्मिन या विद्यार्थीनीने आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. भाग्यश्री वाळके, प्रा. रोशनी वरक यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमांस सर्व विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.