महिला दिनानिमित्त मालवणात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, लायन्स क्लब मालवणचे आयोजन ; सौ. शिल्पा खोत यांसह महिलांचा सन्मान
मालवण : जागतिक महिला दिन आणि स्वराज्य महिला ढोल पथकाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला महिलांसह पुरुष रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन मालवणच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत व डॉ. शिल्पा झाट्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या मालवण तालुकाध्यक्ष शिल्पा खोत, लायन्स क्लबच्या अध्यक्षा वैशाली शंकरदास, प्रा. सुमेधा नाईक, जयश्री हडकर, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर, पल्लवी तारी खानोलकर, आर्या गावकर, निनाक्षी शिंदे मेतर, निकिता तोडणकर, शांती – तोंडवळकर, कल्पिता जोशी, साक्षी मयेकर, मानसी घाडीगावकर, दीपा पवार, दिया पवार, स्वाती तांडेल, तन्वी भगत, पूजा तळाशीलकर, प्रतीक्षा चव्हाण, साक्षी पार्टे, श्वेता पार्टे, आदी उपस्थित होत्या.
शिबिरास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास गावकर, सोनाली पाटकर, भाई कासवकर, मुकेश बावकर, सुहास ओरसकर, प्रसन्न मयेकर, महेश काळसेकर यांच्यासह विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी लायन्स क्लबच्या वतीने शिल्पा खोत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अन्य महिलांचाही यावेळी सन्मान झाला. या रक्तदान शिबिरात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. तसेच यावेळी पुरुष रक्तदात्यांनी देखील रक्तदान करत सहकार्य केले. या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिम्मीली, रक्तपेढी तंत्रज्ञ श्री. ओगले व मयुरी शिंदे, वाहचालक नितीन गावकर, मदतनीस सुरेश डोंगरे यांचे सहकार्य लाभले.