शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शालेय मुलांना दप्तर वाटप
वायरी भूतनाथ विभागातील चार शाळात उपक्रम ; मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिक अजय पेंडुरकर यांचे सहकार्य
मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटीबद्ध : भाई गोवेकर, हरी खोबरेकर
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ विभागात शालेय मुलांना दप्तर वाटप करण्यात आले. वायरी भुतनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वायरी बांध जिल्हा परिषद शाळा, देवली काळेथर जिल्हा परिषद शाळा आणि तारकर्ली मत्स्यव्यवसाय या चार ठिकाणी दप्तर वाटप करण्यात आले. माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. मुंबई लोअर परेल येथील जुने शिवसैनिक अजय पेंडुरकर यांच्या वतीने ही दप्तरे उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, नाना नाईक, चिंतामणी मयेकर, शिवा माडये, राजू मेस्त्री, आबा केळूसकर, दादा पाटकर, प्रवीण लुडबे, प्रदीप वेंगुर्लेकर, पपी तोडणकर, कृष्णा देऊलकर, मंदाकिनी लोके, प्रताप भाटकर, गौरी जोशी, गोट्या मसुरकर, वायरी भूतनाथच्या मुख्याध्यापिका श्रद्धा केळूसकर, राजेंद्र परब, केतकी पाडगांवकर, मनीषा निकम यांसह अन्य शाळांचे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, ८० % समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणी नुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं काम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर आणि अजय पेंडुरकर यांच्या संकल्पनेतून शालेय मुलांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आज इंटरनेटचे युग आहे. ही शाळा आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून आम्ही डिजिटल केली, असे सांगून आम्ही सुद्धा मराठी शाळेत शिकून त्यानंतर पुढचे शिक्षण घेतले. आता परिस्थिति सुधारली आहे. त्यामुळे जेवढं शिक्षण घेता येईल, तेवढं शिका. परिस्थितीवर मात करुन शिक्षण घ्या. त्यासाठी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा आदर्श घ्या. पुस्तकांचं वाचन जास्तीत जास्त करा. पुस्तकातून ज्ञान मिळवा, असे सांगून येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यातून गावच्या आणि शाळेच्या गरजा भागवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले.
यावेळी भाई गोवेकर म्हणाले, आपला जिल्हा आज पर्यटन जिल्हा झाला आहे. त्यामुळे आपली मुले जास्तीत जास्त शिकली पाहिजे. त्यासाठी मुलांना जास्तीत जास्त शिक्षण सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे सांगून यानंतरच्या काळात मुलांसाठी कोणतीही शैक्षणिक मदत लागली तर हक्काने हाक मारा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही भाई गोवेकर यांनी दिली.