पर्यटन महासंघ भाजपाची “बी” टीम ; राजकोट किल्ला पर्यटकांना खुला करण्याची भूमिका हास्यास्पद

मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांची टीका ; पुतळा कोसळल्यानंतर महासंघ गप्प का राहिला ?

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळ्याची जागा पर्यटकांसाठी खुली करण्यात यावी, अशी पर्यटन महासंघाची मागणी हास्यास्पद असल्याची टीका मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांनी केली आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्यावेळी पर्यटन महासंघाने आपली याबाबतची भूमिका तटस्थपणे स्पष्ट करणे आवश्यक होते. परंतु भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या या पुतळ्याच्या कामाचे भाजपने श्रेय घेतले असल्याकारणाने पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मौन राहणे पसंत केले असल्याचे अन्वय प्रभू म्हणाले. 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अन्वय प्रभू म्हणाले, खरं पाहता मालवण येथे भारतीय नौदलाने राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी व तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचे निश्चित केले, या निर्णयाचा तमाम मालवण असल्याने व शिवप्रेमींनी स्वागत केले होते. परंतु त्यानंतर दुर्दैवाने भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनी या कामाचे श्रेय घेत त्यात हस्तक्षेप केला. परिणामी निकृष्ट दर्जाच्या कमामुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्दैवी घटनेच्या विरोधात मालवणात शिवप्रेमींमधून तीव्र पडसाद उमटले. या जनआंदोलनात मालवण मधील प्रत्येक शिवप्रेमी सहभागी झाला होता.

पर्यटन महासंघ गप्प का राहिला ?

वस्तुतः राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी व तेथे छत्रपतींचा पुतळा उभा राहिल्यानंतर मालवणच्या पर्यटनाला नवी दिशा मिळाली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत व त्यांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा मालवणच्या पर्यटनाचा मानबिंदू बनला होता. असा पुतळा अल्पावधीतच कोसळल्यानंतर मालवणच्या पर्यटनाचे पालकत्व म्हणवून घेणाऱ्या पर्यटन महासंघा कडून प्रतिक्रियेची अपेक्षा होती. परंतु या दुर्दैवी घटनेनंतर उभ्या राहिलेल्या जन आंदोलनात पर्यटन महासंघाने शिवप्रेमींच्या बाजूने उभे राहणे आवश्यक होते. राजकीय भूमिका बाजूला ठेवून एक शिवप्रेमी म्हणून व पर्यटन व्यावसायिक म्हणून पर्यटन महासंघाच्या वतीने बाबा मोंड कर यांनी आपली प्रतिक्रिया देणे आवश्यक होते. परंतु ते या विषयात सोयीस्करपणे गप्प राहिले असल्याचे टीका अनुभव प्रभू यांनी केली.

पर्यटन महासंघ मालवण भाजपाची बी टीम

पुतळा दुर्घटना प्रकरणात पर्यटन महासंघाने आपली राजकीय पादुके बाहेर ठेवून तटस्थपणे भूमिका स्पष्ट करणे आवश्यक होते. पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर हे मालवण तालुका भाजपाचे शहर अध्यक्ष पदी कार्यरत आहेत. याच कारणामुळे त्यांनी पर्यटन महासंघाला भाजपाच्या दावणीला बांधले असून आज पर्यटन महासंघ भाजपाची बी टीम म्हणून काम करत असल्याची टीका अन्वय प्रभू यांनी केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!