वायरी भूतनाथ किनारपट्टी वरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काँग्रेस उपसरपंचांच्या हस्ते भूमिपूजन
तत्कालीन मत्स्योदयोग मंत्री अस्लम शेख यांच्या शिफारस पत्रानुसार २० लाखांचा निधी
मालवण | कुणाल मांजरेकर
वायरी भूतनाथ ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमी रस्त्यालगत किनारपट्टीवर मंजूर झालेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन वायरी भूतनाथ ग्रामपंचायती मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या उपसरपंच सौ. प्राची माणगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत तत्कालीन मत्स्योदयोग मंत्री अस्लम शेख यांच्या शिफारस पत्रानुसार २०२०-२१ च्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
वायरी भूतनाथ ग्रामपंचायत हदीतील स्मशानभूमी रस्त्यालगत समुद्र किनारी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्या करिता काँग्रेस जिल्हा सेवादलाचे श्रीकृष्ण तळवडेकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या २०२०-२१ च्या सभेत २० लाखांचा निधी मंजूर झाला होता. मात्र हे काम रखडले होते. त्याचे भूमिपूजन उपसरपंच सौ. प्राची माणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सिंधुदुर्ग जिल्हा कॉग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, युवक काँग्रेस माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, वायरी ग्रामपंचायत सदस्या ममता तळगावकर, काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सरदार ताजर, मुन्ना झाड, दिलीप मसुरकर, भाई चव्हाण, बाबु लोकेगावकर, विरेश तळवडेकर, हर्षद हळदणकर, श्रेयस माणगावकर, सुनील देऊलकर, ठेकेदार श्री. वाळके आदी उपस्थित होते. या कामाकरीता तत्कालीन मंत्री अस्लम शेख यांच्याकडे श्री. तळवडेकर, देवानंद लुडबे, बाळु अंधारी, अरविंद मोंडकर यानी विशेष प्रयत्न करत मंजुरी मिळवली होती. या कामाबाबत ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.