मालवण शहर विकासाला भरीव निधी : शिवसेना शहरप्रमुखांकडून युतीच्या नेत्यांचे आभार

शहर विकासाला आणखी अडीच कोटींचा निधी मिळणार ; मुख्यमंत्रीही लवकरच मालवण दौऱ्यावर

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्यातील शिवसेना – भाजपच्या युती सरकारने शहराच्या विकास कामांसाठी साडेसहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे यांचे शिवसेनेचा शहरप्रमुख बाळू नाटेकर यांनी अभिनंदन करीत आभार मानले आहेत.

युती शासनाच्या माध्यमातून आता खऱ्या अर्थाने विकासकामाला सुरुवात झाली आहे. आणखी साधारण अडीच कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहर विकासासाठी प्राप्त होणार आहेत. शहरासाठी भूमिगत विद्युत लाईनसाठी तसेच शहरात भेडसावणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सुद्धा निकालात काढण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी गटारे नसतील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची गटारे बांधण्यात येतील. शहरांमध्ये होणारी कामे चांगल्या दर्जाची व्हावी, यासाठी आपण लक्ष देणार आहोत. तसेच मालवण आडारी येथील पुलाचे काम माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पालकमंत्री असताना मंजूर करून घेतले होते. काही कारणामुळे ते रखडले. परंतु आता उद्योग मंत्री उदय सामंत तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ते लवकरच मार्गी लागेल आणि ते पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मालवण दौऱ्यावर येणार असून त्यावेळी जाहीर सभा देखील होईल, असेही बाळू नाटेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!