निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मालवणात “शिवसेनेकडून” जल्लोष !
मालवण : मागील आठ महिन्यांच्या कायदेशीर लढाई नंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेला “शिवसेना” नावासह “धनुष्यबाण” चिन्ह देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून मालवणात जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर एकमेकांना लाडू पेढे भरवून पदाधिकारी यांनी आनंद साजरा केला.
यावेळी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, कुडाळ मालवण प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास गांवकर, अरुण तोडणकर, ऋत्विक सामंत, हर्षद पारकर, कमलाकांत पारकर, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, सोनाली पाटकर, भारती घारकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.