ओरोस येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे २० फेब्रुवारीला उदघाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांसह दिग्गजांची उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दिली.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा उद्घाटन सोहळा होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला खासदार विनायक राऊत, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे, नितेश राणे, वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यास राज्यातील तसेच जिल्ह्यातील पत्रकार मित्रांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. तोरस्कर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!