आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून किल्ले सिंधुदूर्ग वरील भगव्या ध्वजाचे नुतनीकरण

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या भगव्या झेंड्याची गेल्या काही वर्षात वारा, पाऊस व खाऱ्या हवामानामुळे दुरावस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर आ. नाईक यांच्या माध्यमातून या लोखंडी झेंड्यांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली आहे.

किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारासमोर लोखंडी उंच असा भगवा झेंडा आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून काही वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. याचे शिवप्रेमींकडून स्वागत झाले होते. मात्र वारा, पाऊस व खारी हवा यामुळे या झेंड्याची काहीशी दुरावस्था झाली होती. अलीकडेच किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात निर्माण केलेल्या सिंहासनाच्या कामाच्या पाहणीसाठी आमदार नाईक आले असता त्यावेळी शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिकांनी आमदार नाईक यांचे झेंड्यांच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधले होते. याबाबत आ. नाईक यांनी तातडीने लक्ष घालत या झेंड्याची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम शिवजयंती उत्सवाच्या आधी पूर्ण करून घेतले आहे. त्यामुळे याबाबत शिवप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!