शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मालवण किनारपट्टीवर उद्या स्वच्छता मोहीम

माजी खा. निलेश राणे यांची संकल्पना ; सौरभ ताम्हणकर यांची माहिती

मालवण : शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण शहर भाजपा युवा मोर्चा व शिवप्रेमींच्या माध्यमातून शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी मालवण मोरयाचा धोंडा ते राजकोट या किनारपट्टी भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवा मोर्चा मालवण शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे.

शुक्रवारी सकाळी ७ वाजता या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. तरी या स्वच्छता मोहिमेत शिवप्रेमी तसेच सामाजिक संस्थानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!