देवबाग शाळा नं. ३ च्या दुरुस्तीला मुहूर्त ; मंदार लुडबे यांचा पाठपुरावा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे, दत्ता सामंत, संजना सावंत यांच्या माध्यमातून ५ लाखांचा निधी
मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग शाळा नं. ३ च्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे मालवण तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांच्या पाठपुराव्यामुळे या शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी पाच लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन मधून या कामाला मंजुरी मिळाली असून यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, भाजपा नेते दत्ता सामंत, जि.प. च्या माजी अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर करण्यात आल्याचे मंदार लुडबे यांनी सांगितले.
या शाळेची इमारत दुरुस्ती मागील चार ते पाच वर्षे प्रलंबीत होती. यासाठी मंदार लुडबे यांनी जि. प. च्या तत्कालीन अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्याकडे विशेष पाठपुरावा करीत त्यांचे लक्ष वेधले होते. अखेर या कामाला मान्यता मिळाली आहे. यामुळे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.