काळसे अपघातातील मयताच्या कुटुंबियांचे निलेश राणे यांनी केलं सांत्वन !
डंपर मालकाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार
मालवण : काळसे येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील वृद्ध महिला रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचे निधन झाले. तर अन्य चार महिला जखमी झाल्या. भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी काळसेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी तात्पुरत्या स्वरूपात मदत देत डंपर मालकाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही निलेश राणे यांनी दिली आहे.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, राजेंद्र परब, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, उपसरपंच अनिल सरमळकर, आबा हडकर, मंदार लुडबे, रमेश मयेकर, योगेश राऊळ, सुमित सावंत, मनोज काळसेकर, विजय काळसेकर, सचिन सावंत, प्रीतम चव्हाण, मोनिका म्हापणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.