शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थी प्रतिनिधीपदी भाजपा पुरस्कृत तनय सावंत याची निवड
योगेश सर्वेकर सांस्कृतिक विभागप्रमुख ; भाजपा प्रदेश सचिव दत्ता सामंत यांनी केले अभिनंदन
मालवण : मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थी प्रतिनिधी पदी भाजप पुरस्कृत तनय सावंत याची निवड झाली आहे. तर सांस्कृतिक विभागप्रमुख पदी योगेश सर्वेकर याची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मालवण तालुका प्रभारी परशुराम (आप्पा) लुडबे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, वायरी ग्रामपंचायत सदस्य संजय लुडबे, राजू बिडये, शानू वालावालकर आदी भाजप पदाधिकारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.