निलेश राणेंचा पाठपुरावा : २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवणसाठी १.६५ कोटींचा निधी मंजूर
मालवण : राज्यातील सत्ताबदलानंतर गेली आठ वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कुडाळ मालवण मतदार संघातील विकास कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवण मतदार संघासाठी विकासकामांसाठी १ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याजवळ पाठपुरावा केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गिरीश महाजन यांनी पहिल्या टप्यात १ कोटी ६५ लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यातील विकास कामांसाठी १ कोटी ५ लाख तर मालवण तालुक्यासाठी विकासकामांसाठी ६० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कुडाळ व मालवण तालुक्यातील विकास कामांना गती येणार आहे.