आ. वैभव नाईक यांची वचनपुर्ती ….

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेस २५ लाख रुपये मंजूर

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी वेधले होते लक्ष

कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या व्यायामशाळेमध्ये अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी पाळला आहे. या व्यायामशाळेसाठी २५ लाखांचा निधी नगरविकास विभागाने मंजूर केला आहे. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी याकडे आ. वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते.

मालवण नगरपालिकेमार्फत ग्रामीण रुग्णालयानजिक दहा वर्षांपासून व्यायामशाळा सुरु आहे. मालवण मधील अनेक जण या व्यायामशाळेत व्यायाम करीत आहेत. तसेच या शाळेतील अनेक व्यायामपट्टूनी शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेवून बक्षीसे पण मिळवली आहेत. मालवण शहरात गुणवत्ता आहे पण व्यायाम शाळेत अत्याधुनिक साहित्य नसल्याने मोठ्या स्पर्धेत भाग घेताना येथील मुलांना अडचणी येतात. त्यामुळे येथील व्यायामपट्टूनी याठिकाणी अत्याधुनिक व्यायाम साहित्य मिळावे, जेणेकरुन चांगल्या स्पर्धेत सुद्धा येथील व्यायामपटूना सहभाग घेता येईल, अशी मागणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकड़े केली होती. त्यानुसार नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे या व्यायामशाळेत अत्याधुनिक साहित्य मिळण्यासाठी २५ लाख रुपये निधी देण्याची मागणी केली होती. हा निधी उपलब्ध करून देण्याबाबत आ. नाईक यांनी आश्वासित केले होते. त्या मागणीनुसार ७ सप्टेंबर २०२१ रोजी नगर विकास विभाग यांच्याकडील आदेशाप्रमाणे २५ लाख रुपये व्यायामशाळेतील साहित्यासाठी मालवण न. प. ला मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता मालवण शहरात नगरपालिके मार्फ़त एक अत्याधुनिक व्यायामशाळा लवकर सुरु होणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार वैभव नाईक यांचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!