कांदळगाव रामेश्वराच्या देवस्वारीत आ. वैभव नाईक सहभागी

कांदळगाव ते कोळंब पर्यंत पायी चालत घेतले दर्शन

मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपारिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी कांदळगाव येथून किल्ले सिंधुदुर्ग येथे रवाना झाले. या मार्गात ठिकठिकाणी रामेश्वर देवतेचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते. त्यांनी कांदळगाव ते कोळंब पर्यंत पायी चालत श्री. देव रामेश्वराचे दर्शन घेतले.

यावेळी हरी खोबरेकर, मंदार केणी, बाबी जोगी, मंदार ओरसकर, कांदळगाव सरपंच रणजित परब, कोळंब सरपंच सिया धुरी, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, बाबली कांदळगावकर, जी.एस. परब आदींसह कांदळगाव वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3842

Leave a Reply

error: Content is protected !!