निलेश राणेंचा देवलीत ठाकरे गटाला धक्का ; माजी सरपंचासह अनेकांचा भाजपात प्रवेश !
येत्या जि. पं., पं. स. निवडणुकीत गुलाल उधळणार तर भाजपाच ; झेंडा फडकणार तर तोही भाजपचाच : निलेश राणेंचा विश्वास
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील देवली गावात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का दिला आहे. येथील माजी सरपंच विजय चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. मालवण भाजप कार्यालय येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
दरम्यान, भाजपच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्या बरोबरच गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आणि येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही गुलाल उधळणार तर भाजपाच आणि झेंडा फडकणार तर तोही भाजपचाच, असा विश्वास निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सरपंच विजय चव्हाण यांच्यासह शिवदास चव्हाण, रामू चव्हाण, गुरुनाथ चव्हाण, गुरुनाथ पाटकर, समीर वेतुरेकर, गुरुप्रसाद चव्हाण, अमित वाक्कर, आबा पोयरेकर, रोहन मयेकर, विजय सावंत, अक्षय चव्हाण, दिगंबर चव्हाण, प्रकाश चव्हाण, बंटी चव्हाण, विलास चव्हाण, मंगेश वाक्कर, महादेव चव्हाण, सागर करंगुटकर, संदेश वेतुरेकर, बबन परब, किशोर चव्हाण, शैलेश चव्हाण, राहुल चव्हाण, राजा सावंत, दीपेश माडये, समीर वाक्कर, राजेश पोपकर, महेंद्र थवी, अविनाश चव्हाण, संतोष मांजरेकर, नरेश चव्हाण, दत्ता गोवेकर, योगेश बोवलेकर, सिद्धेश बिरमोळे, अजित चव्हाण, निखिल चव्हाण, युधार्जित चव्हाण, दीपक चव्हाण, विनायक चव्हाण, आनंद चव्हाण, अजय चव्हाण व अन्य ग्रामस्थ यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यांचं भावनेतून आम्ही सर्वांनी भाजपात प्रवेश केला आहे. भविष्यात संपूर्ण गाव भाजपमय करणे हेच आमचे प्रयत्न राहणार आहेत. असे विजय चव्हाण, रामू चव्हाण यांनी प्रवेशकर्ते यांच्या वतीने स्पष्ट केले.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा परिषद विभाग निरीक्षक अशोक तोडणकर, खरेदी विक्री संचालक आबा हडकर, के. पी. चव्हाण, अवि सामंत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, वासुदेव चव्हाण, विक्रांत नाईक, वैभव चव्हाण, राजू चव्हाण, महेश नाईक, सूर्यकांत चव्हाण, शक्ती केंद्र प्रमुख विरेश मांजरेकर, पांडुरंग मायनाक, हरीश गावकर, भाई मांजरेकर यासह अन्य उपस्थित होते.
भाजप पक्षात पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या सर्वच ठिकाणी वाढत आहे. विकास भाजपच्याच माध्यमातून होणार हे जाणूनच पक्षप्रवेश होत आहेत. शतप्रतिशत भाजप हेच आमचे लक्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका, विधानसभा या सर्व निवडणुकीत विजयाचा गुलाल हा भाजपचाच उडणार व विजयी झेंडा भाजपचाच फडकणार आहे. सर्वांनी जोमाने काम करा. गावांच्या विकासासाठी आम्ही सर्व भाजपच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत. असे माजी खासदार निलेश राणे यांनी या निमित्ताने सांगितले.