रेवतळे फाटक शाळेत महारक्तलॅब शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रेवतळे फाटक शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तलॅब शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा ११० नागरिकांनी लाभ घेतला.

सकाळी १० ते १ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात थायरॉईड, HB, HBA1C, उपाशी पोटी आल्यास कॉलेस्ट्रोल या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला आघाडी शहर प्रमुख रश्मी परुळेकर, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, माजी नगरसेवक मंदार केणी, नगरसेविका शिला गिरकर, दर्शना कासवकर, भाई कासवकर, उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, चेतन खोत व अन्य नागरिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!