मालवणच्या आर. के. इलेक्ट्रॉनिक्सची सामाजिक बांधिलकी
मसुरे नं.१ शाळेला स्पिकर ट्राँली भेट ; शिक्षक, संस्था पदाधिकाऱ्यांनी मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
वैशिष्ट्यपूर्ण ग्राहक सेवेमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या विक्रीमध्ये जिल्ह्यात नावाजलेल्या मालवण येथील आर. के. इलेक्ट्रॉनिक्सने सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दाखवून दिला आहे. मालवण तालुक्यातील जि.प. मसुरे शाळा नं.१ या केंद्रशाळेला आर. के. इलेक्ट्रॉनिक्स मालवण कडून काँडलेस माईकसह ट्राँली स्पीकर सेट भेट देण्यात आला.
सुमारे पाच हजार रुपये किंमतीचा हा सेट आर. के. इलेक्ट्रॉनिकतर्फे मसुरे नं. १ शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ. शर्वरी शिवराज सावंत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. मसुरे नं.१ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर, माजी अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, केंद्रप्रमुख नारायण देशमुख यांच्यासह शिक्षक वृंदाने आर. के. इलेक्ट्रॉनिकचे विशेष आभार मानले.