टोपीवालाच्या १९ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाचा अश्वभारती फाउंडेशन कडून सत्कार
भाजपा नेते, उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान
मालवण | कुणाल मांजरेकर
सांगली येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित टोपीवाला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा १९ वर्षांखालील मुलींचा संघ विजेता ठरला. या संघाचा मुंबईतील अश्वभारती फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी घुमडे येथे उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुलींच्या संघांसाठी टी शर्ट देण्यात आली.
दत्ता सामंत यांच्या भगिनी कै. प्रा. डॉ. भारती सामंत- तेंडुलकर यांच्या स्मरणार्थ मुंबईत अश्वभारती फाउंडेशन सुरु करण्यात आले आहे. या संस्थेच्या वतीने सदरील मुलींच्या संघाचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाराणसी येथील डॉ. अनिल सिंग, मुंबईतील उद्योजक शक्ती सिंग, डॉ. सारिका सिंग यांच्यासह सामंत कुटुंबिय उपस्थित होते.