मालवणात शिवसेना आक्रमक ; केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी !

प्रत्येक भारतीयाला महागाई भत्ता द्या : तहसील प्रशासना मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन

मालवण : भडकलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तू तेल, डाळींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. असे सांगत मालवण तालुका शिवसेना सोमवारी आक्रमक झाली. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मालवण तहसीलदार अजय पाटणे यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने वाढलेले दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात आणावेत. अन्यथा सर्वसामान्य जनतेस महागाई भत्ता द्यावा. अशी मागणी निवेदन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे सादर केले. सर्वसामान्य जनतेचा आवाज असलेले हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवा, असे शिवसेनेच्या वतीने प्रशासनास सांगण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, नगरसेवक नितीन वाळके मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये, तपस्वी मयेकर, संमेश परब, गौरव वेर्लेकर, उमेश मांजरेकर, बाळू नाटेकर, राजेश गावकर, किसन मांजरेकर, प्रसाद आडवणकर, भाई कासवकर, यशवंत गावकर, मोहन मराळ, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, नंदा सारंग यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी तहसीलदार कार्यालयाबाहेर शिवसेना पदाधिकारी यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

हरी खोबरेकर, तालुकाप्रमुख, शिवसेना मालवण
नितीन वाळके
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!