जनहिताच्या कामांच्या आड आल्यास जशास तसे उत्तर देणार !

युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांचा इशारा ; कुंभारमाठ मधील धक्काबुक्कीचा केला निषेध

मालवण : कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य व युवासेना पदाधिकारी राहुल परब याला उपसरपंचाकडून झालेल्या धक्काबुक्कीचा युवासेना मालवणने निषेध केला आहे. एखादया जबाबदार लोकप्रतिनिधीने जनहिताच्या कामाची चौकशी करताना केलेली धक्का-बुक्की, कितपत योग्य आहे ? यापुढे जनहिताच्या कामाच्या आड कोणी येत असेल तर त्याला युवासेना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीच्या काळात मंजूर होऊन कामाचे आदेश मिळालेल्या अपूर्ण रस्ता कामाबद्दल ठिक-ठिकाणी युवासेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याचमुळे तालुक्यातील महत्त्वाच्या अपूर्ण असलेल्या रस्त्यांची कामे सुरु झाली. त्यामुळे लोकांना होणारा त्रास थांबणार आहे. ही कामे दर्जेदार होईपर्यंत युवासेना शांत राहणार नाही. विकासाची कामे करता येत नसतील तर निदान विकास काम करताना अडथळा आणणे तरी बंद करावे. यापुढील काळातही युवासेना लोकहिताची कामे करण्यासाठी कायमच पुढे राहिल. सदर रस्ता काम ग्रामपंचायत सदस्य राहुल परब याने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने चालु झाले. हे लक्षात आल्याने उपसरपंच यांनी रागाने धक्का बुक्की केली असावी, असे मंदार यांनी यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!