सिंधुदुर्गात पहिला मृतदेह विद्युत दाहिनीवर दहन करण्यात यश !

कणकवली नगरपंचायतीचा उपक्रम ; नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती

कणकवली I मयुर ठाकूर :

कोरोना कालावधीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी निर्माण झाल्याने कणकवली नगरपंचायतीच्या मागणीनुसार तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरपंचायतीला विद्युत शवदाहिनी उपलब्ध करून दिली होती. कणकवली स्मशानूमीतील या विद्युत शव दाहीनीवर गुरुवारी प्रथमच यशस्वीपणे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विद्युत शवदाहिनीतून अस्थी विसर्जन करण्यासाठी मिळतात. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केले आहे.

कणकवली येथील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अभिजीत मुसळे उपस्थित होते. मृतदेहाचे शवदहन आम्ही मोबाईल द्वारे चित्रीकरण केले आहे. या दहन प्रक्रियेला २ फुटाचे लाकडाचे तुकडे लागतात, फक्त २०% टक्के लाकडे लागतात. अवघ्या दोन तासात मृतदेह दहन प्रक्रिया पूर्ण होते. दहन होत असताना धूर हा त्याच मशीन मध्ये फिल्टर होऊन बाहेर जातो. त्यामुळे प्रदूषण न होता पर्यावरण रक्षण होते. मृतदेह जळल्यानंतर राख देखील अल्प प्रमाणात होते. मृतदेहाची राख होत नाही. फक्त कपड्यांची राख होते. मृतदेहाचे अस्थी विसर्जन करण्यासाठी मिळतात. हिंदू धर्मातील सर्व विधी करता येतात. त्यामुळे मृतदेह दहनासाठी विद्युत दाहिनीचा वापर करावा. निसर्ग वाचविण्यासाठी नगरपंचायतीला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात पहिला मृतदेह कणकवलीत विद्युत दाहिनीत दहन करणे यशस्वी झाले असल्याने नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी यावेळी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!