दिव्यांगांना मिळणारी पेन्शन दोन – तीन महिन्यांपासून प्रलंबित

दिव्यांग बांधव २६ जानेवारीला आंदोलनाच्या पवित्र्यात ; लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक

कणकवली : दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १००० रुपये पेन्शन मिळते. ही पेन्शन योजना तुटपुंजी असली तरी दिव्यांग व्यक्तींना आधारभूत आहे. मात्र ही पेन्शन दिव्यांग व्यक्तींना कधी कधी दोन – तीन महिने मिळत नाही. त्यामुळे त्या दिव्यांग व्यक्तीची आर्थिक घडी विस्कळीत होते. अलीकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता हा जानेवारी महिना अर्धा संपला तरी देखील अद्यापही दिव्यांग व्यक्तींच्या खात्यावर पेन्शन जमा झालेली नाही. त्यामुळे संबंधितांची गैरसोय होत असून शासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. दिव्यांगाना तुटपुंजी पेन्शन सुद्धा जर प्रशासन, शासन वेळेत देण्यास हतबल असेल तर संबंधीत अधिकाऱ्यांना २६ जानेवारी रोजी धारेवर धरून जाब विचारणार असल्याच्या प्रतिक्रिया दिव्यांग व्यक्तींकडून जोर धरू लागल्या आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!